Labels: ,

बघ तुला जमत का ??????



बघ तुला जमत का ??????
प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?
माझ्या घड्याळाला १००% टाईमावर अलार्म वाजवायला आठवत 
बघ तुला काही त्यातून घेता आल तर............
प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?
बघ जरा तुला balance संपवायला जमत का......?
कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,
बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल तर.............
प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?
फुलपाखरा सुद्धा मध असलेलच फुल बरोबर निवडतात,
बघ तुला त्यांच्या सारखा काही करता आल तर............
प्रत्येक वेळी मीच मिठीत घ्यायला हव का ?
बघ तुला लाजून हिरमुसून मिठीत घेता आल तर ........
तो बघ झाड त्याला वेलींनी चारही दिशांनी व्यापून मिठीत घेतलाय,
बघ त्या वेलीन पासून काही निरीक्षण करता आल तर........
प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच द्याला हव का ?
बघ कधीतरी तुला करता आल तर.........
पक्षी हि भेटतात एकमेकांच्या ओढीने
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ?
प्रत्येक वेळी मीच कविता करायला हवी का?
बघ तुला तुझ्या भावना बाहेर काढता आल्या तर?
हि कविता तुला आवडलीच असेल 
मग बघ यातून काही प्रेरणा घेता आली तर.........
बघ जरा तुला.............हे जमलच तर.............




0 comments:

Post a Comment