Labels:

सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या



आजची कविता पाठवली आहे ज्योति पाटिल  ह्यानी

सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या
जपेन मोती मी आसवातील तुझ्या
वाचेन मौन मी नयनात तुझ्या
सोड हा खेळ शब्दांचा तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

सारेन मी दूर अंधार जीवनातील तुझ्या
वेचीन काटे मी वाटेतील तुझ्या
सोड हा अबोला ओठांचा तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

माळीन मोगरा मी वेणीत तुझ्या
हर्षेल चांदणेही हास्याने तुझ्या
विरघळुदे तेव्हा मला मिठीत तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

गुंफेन शब्दफुले मी आठवात तुझ्या
गाईन गीत मी विरहात तुझ्या
का ग छळंसी या वेड्याला तुझ्या
सखे! फक्त दे एकदा हात हातात माझ्या...

तुमचे लिखाण आम्हाला पाठवा...

0 comments:

Post a Comment