Labels: ,

मला खूप वाटत...

0 comments






मला खूप वाटत...

मला खूप वाटत की तुला पल्सरवरून फ़िरवाव,


मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर गप्पा मारत बसाव,


'राणीचा हार'बघून तुला प्रसन्न वाटाव,


माझ्या राणीचा चेहरा बघून माझही मन हसाव!! 

मला खूप वाटत की तुला मुव्हीला न्याव,


मुव्ही बघून रडताना,माझ्या खान्द्यावर तुझ डोक असाव,
येताना तुझ्याबरोबर candle light dinnerला जाव,
शेवटी घरी सोडताना शेवटपर्यन्त TATA कराव!!

मला खूप वाटत की अशाच कविता करत राहाव,
तुझ्या सगळ्या आठवणीना लहान बाळासारख जपाव,
ह्या आठवणीनी मन नेहमीच पुलकित व्हाव,

मरेपर्यन्त ओठावर फ़क्त तुझच नाव असाव!!

Labels: ,

बघ तुला जमत का ??????

0 comments



बघ तुला जमत का ??????
प्रत्येक वेळी मीच आठवन काढायला हवी का ?
बघ तुला आठवन काढायला जमत का ?
माझ्या घड्याळाला १००% टाईमावर अलार्म वाजवायला आठवत 
बघ तुला काही त्यातून घेता आल तर............
प्रत्येक वेळी मीच call करायला हव का ?
बघ जरा तुला balance संपवायला जमत का......?
कंपनी वाले दररोज न चुकता call करतात,
बघ तुला त्यांच्या कडून काही घेता आल तर.............
प्रतेक वेळी मीच फुल द्यायला हव का?
बघ तुला मार्केट च्या गर्दीतून छानस फुल शोधता येत का ?
फुलपाखरा सुद्धा मध असलेलच फुल बरोबर निवडतात,
बघ तुला त्यांच्या सारखा काही करता आल तर............
प्रत्येक वेळी मीच मिठीत घ्यायला हव का ?
बघ तुला लाजून हिरमुसून मिठीत घेता आल तर ........
तो बघ झाड त्याला वेलींनी चारही दिशांनी व्यापून मिठीत घेतलाय,
बघ त्या वेलीन पासून काही निरीक्षण करता आल तर........
प्रत्येक वेळी भेटीच वचन मीच द्याला हव का ?
बघ कधीतरी तुला करता आल तर.........
पक्षी हि भेटतात एकमेकांच्या ओढीने
बघ त्यांच्या कडून काही घेता आल तर ?
प्रत्येक वेळी मीच कविता करायला हवी का?
बघ तुला तुझ्या भावना बाहेर काढता आल्या तर?
हि कविता तुला आवडलीच असेल 
मग बघ यातून काही प्रेरणा घेता आली तर.........
बघ जरा तुला.............हे जमलच तर.............




Labels: ,

गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत

0 comments


गेली आहेस दूर आता येऊ नकोस परत


गेली आहेस दूर आता येऊ
नकोस परत,



आता तुझी वाट पाहण्याची वाटत
नाही गरज..



अशीचं दूर दूर जा घेऊन त्या
हिरव्या आठवणी,

कोमेजुन गेल्यावर त्याना आता घालू
नकोस पाणी..

आता तू चालली आहेस
एकांत प्रवासाला,

किती अलगद तडे दिलेसना गं
माझ्या विश्वासाला..

थांबू नकोस आता वेळ
गेली टळून,

अशी समजू नकोस की माझे
ह्रदय येईल भरून..

तुझ्यासारखाचं मी ही झालो
आता निष्ठुर,

जसा शांत आगीतून निघतो

फक्त धुर..

Labels: , ,

प्रेमव्यथा

0 comments





प्रेमव्यथा
काल पाहिले ते हिरवे झाड आज ते सुकले होते ,
नंतर कळले कि ते कोणाच्यातरी प्रेमाला मुकले होते ,

काल पहिला एक पक्षी पिंजऱ्यात एकटाच तडफडत होता ,
नंतर कळले कि तो प्रेमात फसूनच तिथे अडकला होता …

काल पाहिले एक चांदणे दिमाखाने चमकत होते
चंद्राच्या मोहात पडून आज त्याला ग्रहणाने गिळले होते …

काल पाहिले एक भ्रमर कमळाच्या कुशीत निजले होते ,
आज कमळाच्या गळण्याने ते वेड्यासारखे इतरत्र फिरत होते …

काल पाहिले चंदनाचे खोड सौंदर्याने नटले होते ,


प्रेमाचा सुगंध वाटून आज ते पूर्णत: झिजले होते …

Labels: , ,

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना.

0 comments






माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना.....
माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, 
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, 
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, 
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे, 

तू आहेस माझी स्वप्न परी, 
नाही भाळलो फक्त तुझ्या रुपावरी, 
फुलनार्या फुलाला घेऊन जाईल कुणीतरी, 
मी मात्र तसाच राहील वार्यावरी, 

येतील तुझ्या आठवणी एक एक करूनी,
ढाल हास्याची करूनी मन जळतय आतुनी, 
फुलांचा गंध साठवून ठेवते मधुराणी, 
तसाच तुझ्या प्रीतीचा गंध ठेवला आहे जतुनी, 

माझ्या या नजरेची भाषा तुला कळता कळेना, 
काय चाललाय हा खेळ मन जुळता जुळेना, 
माझ्या या वेड्या मनाला वेड का तुझे लागावे, 
तू होणार नाहीस माझी या वेड्या मनाला कुणी सांगावे...!!!

Labels: ,

झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा

0 comments




                                                                                              
झेंडा स्वराज्याचा.. झेंडा शिवराज्याचा
महाराष्ट्राच्या मातीमधुनी आवाज उठतो मराठीचा
सह्याद्रीच्या रांगामधूनी सूर्य उगवतो मराठीचा
कीतीही डोंगर पोखरले परक्यांनी तरीही
... सह्याद्री सांधला हा बहुमान मराठीचा
कण्हत्या सह्याद्रीच्या पोटामध्ये
घुमतो आवाज मराठीचा
एकतेची साद घेवुनी
संवाद मराठीचा
शब्द चिंगार
आवाज मराठीचा
संस्कार दिसे खुलुनी
साजशृंगार माय मराठीचा
हाती तेजोमय तलवार तळपते
रणांगणात गर्जतो यलगार मराठीचा
गरजले परके सारे जरी घरात आपापल्या
नभी उठतो बुलंद आवाज हा ललकार मराठीचा
शिवबाची ज्योत ह्रदयी ठेवतो तेवत, बाणा मराठीचा
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.झेंडा स्वराज्याचा..
झेंडा शिवराज्याचा..

गर्जा महाराष्ट्र माझा 

मुजरा राजं मुजरा

"नसेल भगवा शिरावर तर, परका बसेल उरावर" 

मराठा
एकीकरण काळाची, समाजाची, देशाची गरज....उठा मर्द मराठ्यानो एकीची वज्रमूठ
बांधूया महाराजांच्या स्वप्नासाठी पुन्हा क्रांतीची मशाल पेटवुया.....

आण आहे या मातीची, शिवबाला विसरेन ज्या दिवशी त्याच दिवशी राख होइल या देहाची.

Labels: , ,

प्रेम मनातच असणे पुरेसे नसते...!!

0 comments



प्रेम मनातच असणे पुरेसे नसते...!!

जेव्हा मी १५ आणि तू ११ वर्षाची होतीस...मी म्हणलो...
" माझ तुझ्यावर खूप प्रेम आहे " तू विचारलस "ते काय असत ..?"

... आठवतंय..? मी २५ व्या वर्षी तुला म्हणालो "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो..."
तू म्हणालीस..."मला एकटी तर नाही ना सोडणार..?"आणि अलगद माज्या मिठीत विरघळलीस...!!

३५ व्या वर्षी ...जेव्हा एकदा मी रात्री उशिरा घरी आलो..तू आणि मी सोबतच डिनर घेतलं...
मी तुला जवळ ओढून म्हणालो..."I love you...!!" तू माझ्या कपाळावर ओठ टेकवत म्हणालीस..
" I know that.." पण सकाळी मुलांचा पेपर आहे...उशीर नको व्हायला आता जास्त...आता झोपू यात लवकर...!!

माझ्या ५० व्या वाढदिवशी सगळे पार्टी मध्ये गुंग असताना,मी हळूच म्हणालो..."I love you very much "
तू हसत हसत म्हणालीस ..."माहित आहे आगी २० वर्ष आधी पासून माहित आहे.." आणि पुन्हा तुझ्या विश्वात रंगून गेलीस...!!

तेव्हा मी ६० वर्षाचा झालो होतो...
आपल्या मुलाच्या लग्नात तू घातलेली पैठणी पाहून मी म्हणालो...
" छान दिसतेस...आणि अलगद तुला जवळ करून म्हणालो...तू मला खूप आवडतेस...आणि माझ तुझ्य्वर खूप प्रेम आहे..."
तू मला बाजूला सारत म्हणालीस..."ते ठीक आहे हो...!! पण सगळ व्येवास्थित अरेंज झालाय ना..?"

मी आत ७५ वर्षाचा..,आराम खुर्चीवर बसून....आपला जुना अल्बम बघत होतो...,
तू स्वेटर वीणत होतीस..नातवासाठी..मी म्हणालो "माझ तुझ्यावर अजून हि तितकाच प्रेम आहे ..!"
आणि तू म्हणालीस...."माझ पण तुझ्यावर आजही तितकच प्रेम आहे जितक तुला होकार देताना होत.."

माझ्या हातातील तो आठवणींचा साठा असलेला अल्बम पूर्ण भिजून गेला...
डोळ्यातून पडणारे थेंब अनावर होत होते ...कारण आज इतक्या वर्षांनी ...तू स्वतः म्हणाली होती...तू सुद्धा माझ्यावर प्रेम करतेस म्हणून...!!

{फक्त प्रेम पुरेसे नसते...कारण तुमच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीला काहीच नको असत...त्याला ओढ असते ती फक्त ओढ असते ती फक्त ते शब्द ऐकायची जे सांगतात ..."हो माझ पण तितकाच प्रेम आहे तुझ्य्वर ..जितका तुझ माझ्यावर आहे....म्हणून जेव्हा पण संधी मिळेल सांगायला चुकू नका....तुम्ही सुद्धा प्रेम करतात ते...)
(¯`•.•´¯) (¯`•.•´¯)
*`•.¸(¯`•.•´¯)¸.•´* ♥
☆ º ♥ `•.¸.•´ ♥ º ☆

Labels: ,

तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली

0 comments




तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली,

थरथरत्या हातांनी त्यावरची आसवं पुसली,
एक आसू नेमका तिच्या नावावरच पडला,
नाव ख़राब होइल, म्हणुन पुसनारा हात अडला...,

दोन-चार थेम्बं तिच्या बापाच्या नावावरही पडली होती,
ज्याच्याकडे पदर पसरवून ,'ती' माझ्यासाठी रडली होती,

एक थेम्ब पडला तिथे, जिथे आप्तांची नावे दाटली होती,
बहुदा माझ्यासोबत फिरताना, तिला ह्यांचीच भीती वाटली होती.,

'आमच्या ताईच्या लग्नाला नक्की यायचे हं'..,
यावरही एक थेम्ब पडला,
'ताई तू जा, मी नाही सांगणार कुणाला,..
तो भाबडा बोल आठवला...,

काही घसरलेली आसवं, लग्नस्थळ दर्शवत होती,
अगदी त्याच्याच समोर आमची भेटायची जागा होती,

'अहेर आनु नये' यावरही थोडा ओलावा होता,
तिच्या बर्थडे गिफ्ट साठी, मी मोबाइल विकला होता.......,

सगळी मित्रमंडळी माझ्यावर हसली.,
तिच्या लग्नाची पत्रिका आज घरी दिसली.......,


आज घरी दिसली............!

Labels: , ,

ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....

0 comments






ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातात....मी बोलतच नाही
डोळ्यांत दाटलेले भाव तसेच विरून
जातात....
तिला कळतच नाही
तिच्याकडे पाहिलं की पाहतच राहतो...
स्तब्ध होऊन
तिच्याकड नाही पाहिलं की तीच निघून
जाते...
क्षुब्ध होऊन
चंद्र तारे तोडून तिला आणून द्यायचं
मनात येतं
पण हे शक्य नाही हेही लगेच ध्यानात येत
मग मी माझी इच्छा फुलावरच भागवतो
बुकेही नाहीच परवडत हाही हिशेब
आठवतो
पण फुल तिला द्यायची हिम्मतच होत
नाही
बोलणच काय,
तेव्हा तिच्या बाजुलाही फिरकत नाही
मग एखाद्या जाड पुस्तकात फुल तसच सुकत
जातं
सगळी तयारी सगळी हिम्मत नेहमी असंच
फुकट जातं
काही केल्या तिच्या मनाचा थांगपत्ता लागत
नाही
माझं मन तिच्याशिवाय
काहिसुद्धा मागत नाही
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
ती नाही म्हणेल याची भीती वाटते
पण तरीही आज ठरवलंय तिला सांगायचं
तिच्यसाठी असलेलं आयुष्य तिच्याच
स्वाधीन करायचं
कुणास ठाऊक?
तिच्याही एखाद्या पुस्तकात


माझ्यासाठीची सुकलेली फुलं असतील

Labels: , ,

मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,

0 comments



मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...

मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...

मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...

मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...

मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...

मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...

मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..

मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..

मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..